मुंबईतील पोलीस डिपार्टमेंट मधील अँटी नार्कोटिक सेल कडून तब्बल 1 हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अमली पदार्थांचा एवढा मोठा साठा मुंबई पोलिसांनी वाकोला परिसरातून जप्त केला आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे अनेक तरुणांचे आयुष्य वाया जाण्यापासून बचाव झाला आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला केलेली मुंबई पोलिसांची ही सगळ्यात मोठी कार्यवाही आहे. या अमली पदार्थामध्ये 100 किलो फँटानिल होतं. अमली पदार्थांमध्ये फँटानिल हे सगळ्यात हानिकारक अमली पदार्थ आहे. या 100 किलो ड्रग्ज बरोबरच पोलिसांनी एक गाडी ही ताब्यात घेतली आहे.

हे सर्व अमली पदार्थ मुंबई बाहेर पाठवण्यात आले होते, तिथून ते विदेशातील वेगवेगळ्या देशात पाठवण्यात येणार होते. वाकोल्या मार्गे ते विदेशात पाठवण्यात येणार होते, मात्र मुंबई पोलिसांच्या वेळेवर झालेल्या कारवाही मुळे अमली पदार्थांचा एवढा मोठा साठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांच्या हाती सापडलेले 4 जण आता पोलीस कस्टडीत आहेत. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. अमली पदार्थांचा एवढा मोठा साठा सापडला म्हणून पोलीस गप्प बसले नाहीत, तर त्यांनी या केसचं कसून इन्वेस्टीगेशन चालू ठेवलं आहे. तस्करांच्या आणखी काही अड्ड्यांचा शोध लागतो का याचा ते तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here