असं म्हटलं जातं की जेंव्हा ध्येय निश्चित असतं, तेंव्हा वाटेत कितीही संकटे आली तरी त्या व्यक्तीला कोणीही अडवू शकत नाही. फिलिपिन्स मध्ये असच एक उदाहरण पाहायला मिळालं. येथे 11 वर्षाच्या एका मुलीने असाच एक जबरदस्त कारनामा करून दाखवला आहे, त्यामुळे ती मुलगी सोशल मीडियावर स्टार झाली आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या मुलीकडे धावण्याची जिद्द होती. तिला धावपटू व्हायचं होत. त्यामुळे आपल्याकडे बूट नाहीयेत म्हणून बसून न राहता तिने पायाला बँडेज लावून शर्यतीत भाग घेतला आणि एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन गोल्ड मेडल जिंकले.
मीडिया रिपोर्टनुसार फिलिपीन्स च्या इलोइलो प्रांतातील स्थानिक शाळेत ती मुलगी शिकायला आहे. तेथे अंतर शालेय अथलेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 400 मी., 800 मी., आणि 1500 मी. असे तीन प्रकारच्या धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या मध्ये 11 वर्षीय रिया बुलॉस ह्या मुलीने बूट न घालता भाग घेतला आणि तिन्ही प्रकारात तिने सुवर्णपदक पटकावले. तिन्ही सुवर्णपदक पटकावून तिने सर्व प्रेक्षकांना अचंबित करून टाकले. सर्वांची स्तुतीसुमने तिच्यावर बरसली.
इलोइलो स्पोर्ट्स कौन्सिलचे कोच प्रेड्रिक बी वैलेंजुएला यांनी रियाच्या या असाधारण यशाची पोस्ट सोशल मीडियावर त्यांनी शेअर केली. त्यांनी काही फोटोज सुद्धा शेअर केले त्यात दिसून येत आहे की कशाप्रकारे पायाला बँडेज लावून रियाने तिन्ही धाव प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. त्या बँडेज वर नाईकी लिहिलं होतं आणि नाईकी कंपनीचं चिन्ह सुद्धा त्यावर काढलं गेलं होतं.
New design of spike shoesMade in PhilippinesNIKECongratulations RHEA BULLOS of Balasan 3GOLDS400m dash ELem Girls800m run Elem Girls1500m run Elem Girls
Posted by Predirick B. Valenzuela on Monday, 9 December 2019
प्रेड्रिक बी यांची पोस्ट व्हायरल होताच रियासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले आणि तिला बूट खुशीने देण्यात आले. एका व्यक्तीने तर नाईकी कंपनीलाच कमेंट करत कंपनीने मोठ्या मनाने रियाला मदत करावी, अशी याचना सुद्धा केली आहे.