सुरत येथील हिऱ्यांचे व्यापारी सावजी ढोलकीया यांनी आपल्या तीन कर्मचाऱ्यांना तीन ‘Mercedes-Benz GLS SUV’ गाड्या गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. त्यांच्या कंपनीला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या खुशीत त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या महागड्या गाड्या बक्षीस म्हणून देऊ केल्या.

सध्या या गाड्यांची सुरत येथे किंमत जवळपास 1 कोटी रुपये इतकी आहे. म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या 25 वर्ष पूर्ण होण्याच्या आनंदात एकूण 3 कोटी रुपयांच्या तीन Mercedes SUV देऊ केल्या. या V6 डिझेल इंजिन असलेल्या आणि सेव्हन स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या mercedes-Benz GLS SUVs आहेत.

सावजी ढोलकीया हे नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या गाड्या आणि वस्तू बक्षीस म्हणून देण्याच्या वृत्तीमुळे नेहमी बातम्यात आणि माध्यमांच्या नजरेत असतात. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना Datsun redi-GO या गाड्या दिल्या होत्या. या नवीन वर्षाच्या निमित्ताने देण्यात आल्या होत्या. 2016 मध्ये त्यांनी तब्बल 51 कोटी रुपयांचा बोनस निधी आपल्या कर्मचाऱ्यांना दिला होता आणि याच बरोबर 1260 कार्स आणि 400 फ्लॅट्स पण त्यांनी कर्मचाऱ्यांना वाटप केले होते.

सावजी ढोलकीया म्हणतात कि,” मी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीवर बक्षीस देत असतो. जो जेवढं जास्त चांगलं काम करेल त्याला तेवढं चांगलं बक्षीस मिळेल. माझ्या कंपनीत माझ्यावर नाखूष असलेले कर्मचारी तुम्हाला दिसणारच नाहीत.” सावजी ढोलकीया यांची हरे कृष्णा एक्सपोर्टर्स ही फर्म आहे. यात ते हिरे आणि कपड्याच्या निर्यात करत असतात. त्यांचा वार्षिक उलाढाल 6000 कोटी इतका आहे.