काँग्रेसच्या एका रॅलीमध्ये एक काँग्रेस नेता प्रियांका गांधी ऐवजी प्रियंका चोपडा यांच्या नावाचे नारे लावतो, असा व्हिडीओ खूप वेगाने सोशल मीडियावर पसरत आहे. हा व्हिडीओ काँग्रेस पक्षाच्या जनसभेचा असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओत माजी खासदार सुरेंद्र कुमार यांचा उल्लेख आहे, तसेच दिल्ली काँग्रेस अध्यक्ष सुभाष चोपडा सुद्धा या व्हिडीओ मध्ये दिसत आहेत.

या 22 सेकंदाच्या व्हिडीओ मध्ये घोषणा देणाऱ्या व्यक्तीची जीभ घसरली. तो नंतर माफी सुद्धा मागतो, पण जी गोष्ट त्याच्या तोंडून गेली त्यामुळे संपूर्ण काँग्रेसला पुन्हाएकदा शरमिंदा व्हावं लागतं आहे. घोषणा देत असताना तो म्हणतो, ” सोनिया गांधी जिंदाबाद, काँग्रेस पार्टी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, त्यानंतर म्हणतो प्रियंका चोपडा जिंदाबाद…सॉरी प्रियंका गांधी, सोनिया गांधी.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेक युट्यूब आणि ट्विटर युजर्सनी मजेदार कमेंट सुद्धा केले आहेत. दिल्ली मध्ये येत्या विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण गरमागरम होत आहे. अनधिकृत वस्तीच्या मुद्यावर सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टी आणि केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजप यांच्या श्रेय कोणाला भेटेल यावर तू तू मैं मैं चालू आहे. काँग्रेसने रस्त्यावर उतरून पोल खोल अभियान सुरू केलं आहे.

दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोपडा यांनी पत्रकारांना बोलताना संसदेत अनधिकृत कॉलनीवर जे बिल मांडण्यात आलं आहे, त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे बिल कॉलनीत राहणाऱ्या लोकांसाठी मृत्यूसाठी प्रवृत्त करणारे आहे. दोन्ही पक्ष नाटक करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यांनी सांगितलं की पारित बिल मध्ये ज्या कॉलनीत विजेच्या तारा लटकत्या आहेत आणि ज्यांच्या जवळून हायवे जात आहे, त्या कॉलनीनां वैध मानलं जाणार नाही. त्यामुळे हे बिल येथे राहणाऱ्या लोकांसाठी धोकादायक आहे. त्यांनी पुढे म्हटलं की दिल्लीची आप सरकार सुद्धा मागच्या पाच वर्षांपासून दिल्लीच्या लोकांसोबत नाटक करत आहे.