बॉलिवूडमध्ये अभिनयाबरोबरच अन्य अनेक कारणांसाठी चर्चेत राहणारा अभिनेता रणवीर सिंग पुन्हा एका चर्चेत आला आहे. अनेक वेळा आपल्या नवनव्या डान्स स्टाईलने चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरणारा रणवीर पुन्हा त्याच्या याच डान्स स्टाईलमुळे चर्चेत आला आहे. यावेळी रणवीरने चक्क टेबलावर उभं राहून डान्स केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे त्याच्या या डान्सचा व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय ठरत असून तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनम कपूर -आनंद आहुजा यांच्या लग्नामध्ये डान्स करणारा रणवीर यावेळी त्याच्या बहीणीच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत केलेल्या एका पार्टीमध्ये डान्स करताना दिसला. इतकंच नाही तर तो सरळ टेबलावर जाऊन डान्स करायला लागला यावेळी दीपिका पदुकोणही या पार्टीमध्ये सहभागी झाली होती.

रणवीर सिंगची बहीण रितिका हीचा वाढदिवस असल्यामुळे रणवीर तिच्यासाठी बर्थडेचं गाणं म्हणतांना दिसून आला. त्यानंतर त्याने ‘दिल धडकने दो’ मधील ‘मैं डालूं ताल पर भंगडा’ या गाण्यावर डान्स केला. त्यानंतर त्याने ऋषी कपूर यांच्या ‘बोलो ओम शांति ओम’ हे गाणंही म्हटलं. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये ‘बाजीराव-मस्तानी’ अर्थात रणवीर -दीपिका या जोडीने एकाच रंगाचे कपडे घातल्यामुळे उपस्थित साऱ्यांच लक्ष त्यांच्याकडे वेधलं होतं.