उत्तर प्रदेश मधील बुंदेलखंड मधील महोबा आणि हमीरपुर या दोन जिल्ह्यात वाघाने थैमान घातलं आहे. मागच्या चार पाच दिवसांपासून तो वाघ या दोन्ही जिल्ह्याच्या सीमा भागात फिरत आहे. संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे.

परंतु या वाघाने एक अशी गोष्ट करून दाखवली आहे, जी भारत मागच्या 70 वर्षात करू शकला नाही.!

वाघ दोन्ही जिल्हयातील भागात वावरत आहे, या भीतीने लोक घराच्या बाहेर पडत नाहीयेत आणि उघड्यावर शौचासाठी जायचं लोकांनी बंद केलं आहे. हमीरपूर आणि महोबा हे दोन्ही जिल्हे खूप आधीच उघड्यावर शौच मुक्त जिल्हे घोषीत करण्यात आले आहे, प्रत्येक घरात संडास सुद्धा बांधून देण्यात आलं आहे. असे असताना सुद्धा गावातील लोक आपल्या लागलेल्या सवयीमुळे बाहेर उघड्यावर जायचे.

जिल्हा प्रशासनाने अनेक प्रयत्न करून देखील त्यांना एवढे यश आले नव्हते जेवढे या वाघाच्या भीतीमुळे घडले आहे. जिल्हा प्रशासनाची मनाई असताना सुद्धा लोक उघड्यावर गेले आणि त्यांना वाघाच्या गर्जनेला समोरं जावं लागलं.

ते लोक हमीरपूर/महोबा जिल्ह्याच्या सीमेवर राहणारे होते. वाघाच्या गर्जनेमुळे लोक घरात दडून बसू लागले आणि लोकांच उघड्यावर जायचं बंद झालं. महोबाच्या जिल्हा जंगल अधिकाऱ्याने सांगितले आहे की पन्ना राष्ट्रीय उद्यानातून एक वयस्कर रॉयल बंगाल टायगर भटकून या भागात आला आहे.

वन अधिकारी DFO रामजी राय यांनी सांगितलं की कुंनेहटा गावात युवराज सिंह यांच्या शेतामध्ये वाघ दिसल्याची बातमी त्यांना पहिल्यांदा मिळाली. ज्याच्या आधारावर महोबा सोबतच हमीरपूरच्या वन विभागाच्या टीमला वाघ पकडण्यासाठी बोलावण्यात आलं. महोबा मध्ये वाघ येणें ही काही सोपी गोष्ट नाहीये.

सरकारकडून लखनऊ, कानपूर आणि झांसीच्या वन विभाच्या विशेष पथकाला रवाना करण्यात आलं आहे. गावातील लोकांना सुरक्षित राहण्याकरिता रात्री झोपताना आसपास शेकोटी पेटवून किंवा प्रवेशद्वारावर लोकडांना आग लावून झोपण्याच्या सूचना ही करण्यात आल्या आहेत. वाघाला पकडायला पिंजरा सुद्धा लावण्यात आला आहे.

या वाघामुळे मागच्या पाच दिवसांपासून लोक आपल्या घरातच दडून बसले आहेत. पोलिसांची आणि वन विभागाच्या तुकड्या वाघाला पकडायच्या प्रशिक्षणात व्यस्त आहेत. आतापर्यंत काहीच हातात आलं नाही. युवराज सिंहने सांगितले की सगळ्यात आधी पहिल्यांदा त्यालाच वाघ दिसला होता.

त्याने सांगितलं की या वाघाच्या भीतीमुळे गावातून कोणीच उघड्यावर शौचासाठी जंगलात जात नाहीये. वाघाच्या या कामगिरीमुळे लोक त्याला ODF चा ब्रँड एम्बेसॅडर म्हणून मजे घेत आहेत.

परंतु आपल्याला विचार करायला हवा, की जो पर्यंत आपल्या समोर अतिरेकीसारखी परिस्थिती येत तो पर्यंत आपण सुधारणार नाही आहोत का ? गाढव तेंव्हाच घोड्यापेक्षा फास्ट धावतो, जेंव्हा त्याच्या शेपटीला फटाके लावले जातात. मग एखाद्या गाढवा प्रमाणे आपण धावणार आहोत का ? थोडा विचार करा आणि उघड्यावर शौच करणे टाळा. तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या सुरक्षिततेसाठी शौचायलाचा वापर करा. धन्यवाद !