रविवारचे दिवस तर आपल्याकडे काही जण आरामाच्या नावाखाली सबंधं दिवस अगदी कुंभकरणासारखा झोपून व्यतीत करतात तुम्हीही त्यांच्यापैकीच एक असाल

असं म्हणतात ज्या शब्दाला किंवा वाक्याला आपण ‘च’ लावतो त्या शब्दाला महत्व प्राप्त होतं…म्हणून आपण म्हणतो

“झोप हवीच”

बेंगलोरमधील एका स्टार्टअप कंपनीकडून चक्क एक स्लिप इंटर्नशिप देण्यात येत आहे. या इंटर्नशिपमध्ये इंटर्नला १०० दिवस दिवसात ९ तास झोपण्यासाठी १ लाख रुपये दिले जाऊ शकतात.

वेकेफिट इनोव्हेशन्स तर्फे लोकांच्या झोपेच्या पद्धतींवर लक्ष ठेवण्यासाठी ही “स्लीप इंटर्नशिप” या कंपनीकडून आयोजित केली जात आहे. तसेच यात आणखी भर घालणारी गोष्ट म्हणजे या जगातल्या आगळ्या वेगळ्या नोकरीचा ड्रेस कोड असणार आहे चक्क “पायजामा

मित्रांनो लाखो करोडो तरुणांच्या स्वप्नातील नोकरी अगदी हक्काने चालून आली आहे बरं का?? या संधीचे सोनं आपण करायलाच हवं नाही का?
या कंपनीच्या वेबसाईटवर म्हंटल्याप्रमाणे, ही स्लीप इंटर्नशिप म्हणजे आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याचा एक प्रयत्न आहे. झोपेमुळे आपले आरोग्य संतुलित राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यासाठीचा हे एक पाऊल आहे.

स्लीप इंटर्नशिपमध्ये आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे?

  • इंटर्न्सनी कंपनीकडून प्रदान केलेल्या गाद्यांवर १०० दिवस ९ तास तसेच याचसोबत आठवड्यातून ७ रात्री घरी झोपण्याची अपेक्षा कंपनीकडून केली जाईल.

सदर कंपनीच्या वेबसाईटवर काय लिहिले आहे?

“तुम्ही फक्त झोपा. जितके शक्य असेल तितके झोपा, याचसोबत जितके शक्य तितके स्पर्धात्मक बनण्याचा विचार करा, आपण फक्त विश्रांती घ्या. बाकी सारं काही आमच्यावर सोडा.”

इंटर्नशिप म्हणजे काही केवळ झोप नव्हे यांच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे –

  • कोणत्याही इंटर्नला त्यांच्या ‘कामाच्या’ वेळी लॅपटॉप वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • निवड झालेल्या इंटर्नला १०० दिवसांनंतर काम योग्य प्रकारे पूर्ण केल्यावरच १ लाख रुपये दिले जाणार आहेत.

झोपेच्या इंटर्नशिपसाठी आपल्याला कोणकोणत्या कौशल्याची आवश्यकता आहे?

  • कंपनीच्या वेबसाईटनुसार, आपल्याला इंटर्नशिपसाठी आवश्यक असलेले एकमात्र कौशल्य म्हणजे “मनात असलेली झोपेची कट्टर भावना आणि अगदी कमी संधी मिळाल्यावर झोपी जाण्याची जन्मजात क्षमता.”
  • आपल्या स्वतःच्या झोपेच्या नोंदीचा पट तोडून काढण्याचा एक अनोखा उत्साह, या उत्कृष्ट कलेवर प्रभुत्व मिळवण्याची अपेक्षा!
  • सर्वांत महत्वाचं म्हणजे या इंटर्नशिपचा ड्रेस कोड पायजमा..

काय मग आहे कि नाही ही आगळी वेगळी इंटर्नशिप! आणि आता तुमच्यापैकी किती जण या आगळ्या वेगळ्या इंटर्नशिपमध्ये सहभागी होणार??

या जॉब ला अप्लाय करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा – Click Here