21 व्या शतकातल्या तंत्रज्ञानाचा आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा मेळ घालत पुण्यातील सहकार नगर येथे राहणाऱ्या संजीव कुलकर्णी यांनी एक मोदक मशीन तयार केली आहे. ही मशीन आपल्या बँक अकाउंट मधून पैसे काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ATM मशीनच्या आधारावर तयार केली आहे.

महाराष्ट्र्रात गणपती उत्सव खूप जोरात साजरा केला जातो, महाराष्ट्रात खास करून पुण्याचा गणपती उत्सव हा जास्त जोरदार आणि आगळ्यावेगळ्या प्रकारचा असतो. प्रत्येक जण आपापली कला, आपले किएटीव्ही मन वापरून याला साजरा करण्याचा प्रयत्न करतात. असंच एक मन घेऊन संजीव कुलकर्णी यांनी हे मोदक देणार आणि हुबेहूब ATM सारखं दिसणारं हे मशीन तयार केलं आहे. या मोदक देणाऱ्या मशीनला सुद्धा त्यांनी मोदक ATM असंच नाव दिलं आहे फक्त यात ATM चे पूर्णरुप मात्र Any Time Modak असं त्यांनी सांगितलं आहे.

संजीव कुलकर्णी यांनी ANI च्या मुलाखतीत बोलताना सांगितलं की, “हे ATM म्हणजे Any Time Modak मशीन आहे, तुम्हाला मोदक एक विशिष्ट कार्ड वापरल्यानंतरच मिळेल. तुम्हाला ते कार्ड स्वाईप करूनच ते मोदक घेता येणार आहे. हे मशीन म्हणजे संस्कृती आणि तंत्रज्ञान यांचा सुंदर असा मिलाफ आहे.” असं संजीव कुलकर्णी म्हणाले.

हा ATM कसा काम करतो याचा विडिओ पहा – 

हा विडिओ डायरेक्ट ट्विटर वर बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Image Source – ANI Twitter

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here