मुंबई येथे असलेल्या राजभवनात शनिवारी दोन भव्य अशा ब्रिटिश कालीन तोफा माती खाली गडून गेलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. असं सांगितलं जातंय की या तोफा तब्बल 22 टन वजनाच्या आहेत. शनिवारी या तोफांना जमिनीतून क्रेनच्या मदतीने काढण्यात आले. या तोफांकडे दुर्लक्ष केल्यामुळे या अशा अवस्थेत आढळल्या असल्याचं म्हटलं जातं आहे. अनेक वर्षांपासून कोणत्याही सरकारने या तोफांकडे लक्षच घातलं नाही, त्यामुळेच या तोफा जमिनी खाली गाडल्या गेल्या आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या तोफांच्या उत्खननासाठी खुद्द सूचना दिल्या होत्या. आणि शनिवारी झालेल्या या उत्खननाच्या कामाची घटनास्थळी जाणून पाहणी ही राज्यपालांनी केली. या खूप दशकांपूर्वीच्या तोफा आहेत. त्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन राज्यपालांनी नौदलाच्या तज्ज्ञांकडून या तोफांची तांत्रिक माहिती आणि तसेच या तोफांचे जुने अभिलेख असतील तर त्याचा तपास करण्याची सूचना राज्यपालांनी राजभवनातील अधिकाऱ्यांना दिल्या. राज्यपालांनी या उत्खननात काढलेल्या तोफांना राजभवनाच्या जल विहार म्हणजेच बँक्वे हॉलच्या समोर ठेवण्याची सूचना ही केलेली आहे. त्यामुळे पर्यटकांना, सामान्य नागरिकांना आणि इतिहास प्रेमींना या तोफा आता पाहता येणार आहेत.

या तोफांचा शोध महाराष्ट्र सरकारच्या 13 कोटी वृक्ष लागवड योजनेमुळे लागला आहे. काही महिन्यांपूर्वी राजभवनाच्या परिसरात अगदीच सांगायचं झालं तर, राजभवनात प्रवेश केला बरोबर समुद्राच्या दिशेने जी हिरवळ दिसते, तिच्या तळाशी वृक्षारोपणाचे कार्य चालू होते. त्यावेळी वृक्षारोपण करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना या तोफा माती खाली गाडलेल्या अवस्थेत आढळुन आल्या. या तोफा अनेक वर्षांपासून पडून राहिल्याने त्या माती खाली गाडल्या गेल्या असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या दोन जुळ्या तोफा आहेत, एवढ्यापर्यंत माहिती त्या कर्मचाऱ्यांना कळली. या तोफा 22 टन वजनाच्या आहेत आणि तसेच त्यांची लांबी ही 4.7 मीटर आहे आणि रुंदी म्हणजेच त्यांचा व्यास हा 1.15 मीटर इतका आहे. या तोफांना क्रेन च्या साहाय्याने उचलण्यात आले आणि त्यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना राजभवनातील हिरवळीवर ठेवण्यात आले. या दोन तोफांचे ऐतिहासिक महत्व तर आहेच पण आता या तोफा राजभवनाची शोभा वाढवण्याच्याच कामाच्या आहेत. या तोफांमुळे राजभवनाच्या सुंदरतेत वाढ होणार हे मात्र निश्चित.

 

या आधी राजभवनात अंडर ग्राउंड दगडी भुयार ही आढळून आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यावेळी त्या भुयाराची पाहणी ही केली होती. पहा त्या भुयाराचे काही फ़ोटो

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here